इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी तर राज्य सरकारने पूर्ण दिवस सुट्टी आहे. पण, न्यायालयाने मात्र सुट्टी जाहीर केली नसल्याने उद्या सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवून नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले होते. शिंदे यांच्या शिवसेनेला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सुनील प्रभू विरुद्ध शिंदे याचिकेची उद्या सुनावणी होणार आहे.
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे उद्या लोकार्पण होणार आहे. या निमित्ताने ठाकरे गटाने नार्वेकर यांच्या निकालावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती; पण नार्वेकर यांनी गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती वैध ठरवली आहे.