नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मृत महिलेच्या अंगावरील मंगळसुत्र रूग्णालयीन कर्मचारी असल्याचे भासवून भामट्याने लंपास केल्याची घटना जिल्हा रूग्णालयात घडली. या घटनेनंतर सिव्हील चौकीतील पोलीस कर्मचा-यांनी भामट्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून मंगळसूत्र हस्तगत केले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज सुनिल भवर (२६ मुळ रा. विजयनगर कॉलनी,संत जनार्दन स्वामी नगर हिरावाडीरोड हल्ली सैनिक क्लासेस खाली, पंडीत कॉलनी) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. याबाबत गणेश दिलीप माने (रा.दत्तनगर,पेठरोड) यांनी फिर्याद दिली आहे. माने यांच्या आत्या मंगल दत्तात्रेय कदम (रा.शिवाजीनगर,सातपूर) यांना शनिवारी (दि.२०) सकाळच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या मृत्यूची वार्ता कळविण्यात आल्याने नातेवाईकांनी धाव घेतली होती. शवविच्छेदनासाठीचे पोलीस सोपस्कर पार पाडले जात असतांना ही घटना घडली. सिव्हील चौकीत पंचनामा सुरू असतांना मृतदेह रूग्णालयातील गणपती मुर्ती समोर स्ट्रचरवर होता.
पोलीसांनी मृतदेहावरील अलंकार काढण्याच्या सुचना दिल्याने नातेवाईक महिला मृत आत्याच्या अंगावरील दागिणे काढत असतांना संशयिताने महिलांना रोखले. पीएम रूममधील कर्मचारी असल्याचे भासवून त्याने मृतदेहाच्या अंगावरील दागिणे पीएम रूममध्ये काढण्यात येतात असे म्हणून मृतदेह झाकून दिला. यावेळी त्याने नातेवाईकांना बाहेर जाण्याचा सल्ला दिल्याने सर्व मंडळी रूग्णालयाच्या स्पोर्च मध्ये गेली असता संशयिताने मृत महिलेच्या गळ्यातील सुमारे १५ हजार रूपये किमतीच्या मंगळसूत्रावर डल्ला मारला. पंचनाम्यानंतर नातेवाईक बिल्ला बनविण्यासाठी गेले असता तेथेही दागिणे काढले का असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने नातेवाईक असलेल्या दोन तीन महिला मृतदेहाजवळ गेल्या असता अंगावरील मंगळसूत्र लंपास असल्याचे समोर
ही बाब नातेवाईकांनी पोलीस चौकीतील हवालदार पी.एस.जगताप व शिपाई शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्याने भामटा पोलीसांच्या हाती लागला. दोन्ही कर्मचाºयांनी तात्काळ रूग्णालयीन सीसीटिव्ही यंत्रणेची तपासणी करीत भामट्यास हुडकून काढले. रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर भामट्याच्या मुसक्या आवळत पोलीसांनी खाकीचा हिसका दाखवला असता त्याने गुह्याची कबुली दिली. संशयितास सरकारवाडा पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.