इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणा-या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोहळ्याला जाणार नसल्याचे त्यांनी सोशल मीडियात ट्विट करत सांगितले. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे.जय श्री राम…अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीजी यांनी साकार केलं आहे. मोदीजींचे शतशः आभार…
अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.