नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुने नाशिक परिसरातील मौला बाबा दर्गा भागात उघड्यावर जुगार खेळणा-या तिघांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह रोकड हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनीश अब्बास शेख (रा.पंचशिलनगर),अकिल जमिल शेख (रा.नाईकवाडीपुरा) व भरत हेमराज पाटील (रा.त्रिमुर्ती नगर,नवीन आडगावनाका) अशी कारवाई करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत. याबाबत अंमलदार निलेश विखे यांनी फिर्याद दाखल केली आहे. मौला बाबा दर्गामागील मोकळया मैदानावर काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.१९) पोलीसांनी धाव घेत संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
या ठिकाणी संशयित कल्याण मटका नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून अधिक तपास हवालदार सतीश साळुंखे करीत आहेत.