नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १९ ते ३० जानेवारी २०२४ दरम्यान होत असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स च्या नेमबाजी च्या स्पर्धा चेन्नई, तामिनाडूमध्ये होणार आहेत. यामध्ये ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा होणार आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ दरम्यान झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत जे नेमबाज युथ गटात पहिल्या १४ खेळाडूंमध्ये होते त्यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यामध्ये एक्सल टार्गेट शूटर्स असोसिएशन, भीष्मराज बाम मेमोरियल शूटिंग रेंज नाशिक येथे सराव करणाऱ्या अंजली भागवत हीची या स्पर्धेसाठी २५ मिटर पिस्तोल वुमन या ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात निवड झाली आहे. राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ती वयक्तिक ७ व्या स्थानावर होती.
ती श्रद्धा नालमवार यांच्या मार्गदर्शनाखालीखाली सराव करते. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पारख, उपाध्यक्ष शिल्पी अवस्थी व डॉ. योगिनी दीक्षित यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्यात.