नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत वेगवेगळय़ा भागातून चोरट्यांनी रविवारी तीन मोटारसायकली पळवून नेल्या. याबाबत अंबड व सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
औद्योगीक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट भागात राहणारे नारायण दामोधर रायते (रा.पंचरत्न हॉटेल मागे) यांची एमएच १५ जेएफ ११८८ मोटारसायकल गेल्या रविवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. दुसरी घटना दत्तनगर येथील कारगील चौकात घडली. अमोल वसंत मुंगसे (रा.वैष्णवी पॅलेस रो हाऊस,कारगिलचौक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
मुंगसे यांची एमएच २० एएन ७२८ दुचाकी गुरूवारी रात्री त्यांच्या रो हाऊसच्या आवारात लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. दोन्ही गुह्यांबाबत अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अदिक तपास हवालदार चव्हाण व झोले करीत आहेत. तर मंगेश साहेबराव घुगे (रा.खंडेरावनगर,पाथर्डी फाटा) हे गुरूवारी (दि.१८) सातपूर औद्योगीक वसाहतीतील निर्मिती प्रिशीजन या कंपनीत गेले असता अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमध्ये लावलेली त्यांची एमएच ४१ एक्यू २४६८ मोटारसायकल चोरून नेली. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार केदारे करीत आहेत.
			








