इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोलापूरः राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ३५ जागांवर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांचे एकमत झाले आहे. राहिलेल्या १३ जागांवर चर्चा सुरू असून, लवकरच तोडगा निघणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. वंचित आघाडीचा महाविकास आघाडीत समावेशाचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.
पवार म्हणाले, की वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना ‘इंडिया’ आघाडीत घेण्याच्या मुद्यावर चर्चा झाली असून त्यावर अंतिम निर्णयही लवतरच होईल. आ. रोहित पवार यांना बजावण्यात आलल्या ‘ईडी’च्या नोटिशीवर ते म्हणाले, की सरकारने अनिल देशमुख, संजय राऊत यांना जाणीवपूर्वक तुरुंगात टाकले होते; परंतु न्यायालयाने आरोपपत्र पाहून त्यांची सुटका केली. ‘ईडी’ सारख्या तपास यंत्रणांचा उपयोग सरकार एखाद्या शस्त्रासारखा करते. एकट्या रोहित यांनाच नाही, तर सर्वच नेत्यांना ‘ईडी’चा दाख दाखवून सत्तेचा गैरवापर जात आहे. याविषयी स्वस्थ न बसता संघर्ष करू.
दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अणृतमहोत्सवानिमित्तच्या कार्यक्रमाला शरद पवार व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहे.