नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी फाटा भागात रस्त्याने पायी जात असतांना चक्कर येवून पडल्याने ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोरख रामभाऊ सुर्यवंशी (रा. परिवर्तन चौक, साईबाबनगर सिडको) असे मृत वृध्दाचे नाव आहे. सुर्यवंशी शुक्रवारी (दि.१९) सकाळच्या सुमारास पाथर्डी फाटा भागात गेले होते. रायबा हॉटेलच्या दिशने पायी जात असतांना अचानक चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले होते.
मुलगा गणेश सुर्यवंशी यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.