मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रवादी काँग्रेस खरी कुणाची यावरून शरद पवार व अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाने वेळ मागवून घेतल्याने आता ३१ तारखेला निकाल लागण्याची शक्यता नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. दोन्ही गटाची संमती घेवून सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढीचा अर्ज केला जाण्याची शक्यता आहे.
नव्या वेळापत्रकाबाबत नार्वेकर यांनी सुनावणीच्या वेळी चर्चा केली. दोन्ही गटांच्या बाजू योग्य पद्धतीने मांडायच्या असतील, तर वेळापत्रकात बदल करावा लागेल, असे अध्यक्षांचे मत आहे. नार्वेकर यांनी नवे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. २३ व २४ चौघांची उलट तपासणी होणार आहे. २५ तारखेला दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाईल. त्यानंतर दोन्ही गटांचे लेखी सबमिशन दिले जाणार आहे. दोन्ही गट २९ व तीस तारखेला अंतिम बाजू मांडतील. ३१ जानेवारीला सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसांत अंतिम निकाल जाहीर केला जाईल.
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, खा. सुनील तटकरे यांनी दाखल केलेल्या एका प्रतिज्ञापत्रात शरद पवार हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे, असा उल्लेख आहे. शरद पवार फक्त मोजक्या लोकांचे ऐचं ऐकायचे, असे म्हटल्याने आता त्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्हाची लढाई याबाबतची सुनावणी संपली आहे. निकालाची प्रतीक्षा आहे. त्याचा निकाल आता कोणत्याही क्षणी लागू शकतो.