इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाकिस्तानचा माजी कप्तान शोएब मलिक याने दुसरे लग्न केले आहे. टेनिस स्टार सानिया मिर्जाच्या वेगळे होण्याच्या बातम्या सुरु असतांना त्याने हे लग्न केले आहे. शोएब मालिकने हे दुसरे लग्न पाकीस्तानी अभिनेत्री सना जावेदशी केले आहे. सनाचे सुध्दा हे दुसरे लग्न आहे. तीने अगोदर २०२० मध्ये उमैर जसवाल याच्याबरोबर लग्न केले होते.
भारतात शोएब मलिक आणि सानिया मिर्झाने २०१० मध्ये हैदराबादमध्ये मुस्लीम पध्दतीने निकाह केला होता. त्यानंतर पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये वलिमा पार पडला होता. लग्नाच्या आठ वर्षानंतर सानियाने मुलालाल जन्म दिला. सानिया आणि शोएबचा मुलगा इझाना आता पाच वर्षाचा आहे. या दोघांचे बिनसल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती.
पण, मुलाचा वाढदिवस त्यांनी दुबईत येथे एकत्र साजरा केल्यानंतर चर्चेला विराम मिळाला होता. पण, त्यानंतरही पुन्हा चर्चा सुरु झाली. त्यात घटस्फोटाबाबत सानियाने व शोएबने मौन बाळगले होते. पण, आता शोएबने दुसरे लग्न केल्यामुळे या चर्चा अधिकच रंगल्या.