पारोळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील म्हसवे शिवारातील राजस्थानी हॅाटेलच्या मागीत भागात ओमनीमध्ये गॅस भरतांना सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. या ठिकाणी ५१ सिलेंडर होते. त्यातील ८ सिलेंडरचा स्फोट झाला तर ४३ सिलेंडर सुस्थितीत असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर आले कसे याचा तपास आता केला जात आहे.
ओमनी गाडीत गॅस भरतांना गॅस टाकीने अचानक भेट घेतला. त्यामुळे एका पाठोपाठ एक स्फोट होत गेले. ही घटना झाल्यानंतर तहसीलदार व पोलीस घटनास्थळी पोहचले, अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर ही आग विझवण्यात आली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम राजकुमार आपत्कालीन प्रतिसादाचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय अनिल पाटील आणि मंत्री गिरीश महाजन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. विधानसभा सदस्य चिमण आबा पाटील घटनास्थळी पोहोचले होते.