नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्यावतीने ९ ते ११ फेब्रुवारी २०२४ असे तीन दिवस पुष्पोत्सव २०२४ या कार्यक्रमाचे आयोजन राजीव गांधी भवनाच्या प्रांगणात करण्यात आलेले असून या कार्यक्रमात विविध प्रकारची गुलाब पुष्पे, हंगामी फुले, पुष्परचना, मिनीएअचर गार्डन, बोन्साय, कॅक्टस, फळे, भाजीपाला इ.चे स्पर्धात्मक प्रदर्शन ठेवण्यात आलेले आहे.
यात एकुण ५७ गट आहेत. प्रत्येक गटासाठी बक्षिसे ठेवण्यात आली असून महत्वाची बक्षिसे नामांकित कंपन्या, उद्योजक, सहकारी बँका, हॉटेल्स, व्यापारी समुह यांच्याकडुन पुरस्कृत आहेत. दि. ९ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन व ट्रॉफी वितरण समारंभ सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचे हस्ते होणार आहे. दि १० फेब्रुवारी रोजी सोनी मराठी वरील सिरियल तुझं माझं सपान मधील कलाकार, अभिनेता संकेत पाटील, अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण, दिग्दर्शक अवधूत पुरोहित हे उपस्थित असणार आहे. तसेच कलर मराठी या चॅनल वरील सिरियल पिरतीचा वणवा उरी पेटला मधील कलाकार अभिनेता इंद्रनील कामत अभिनेत्री रसिका वाखारकर, दिग्दर्शक अवधूत पुरोहित हे देखिल उपस्थित असणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने सर्व नियोजन लक्ष्मण प्रोडक्शन दवारे कृष्णा मरकड, देवेन कापडणीस, कुणाल वाईक. सदर पुष्पप्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यत नागरिकांना पाहण्यासाठी विनामुल्य खुले राहील. कार्यक्रमाच्या प्रांगणात संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयेाजित करण्यात येणार आहे. ज्या नागरीकांना पुष्पप्रदर्शनामध्ये त्यांचे मार्फत तयार करण्यात आलेल्या विविध कलाकृती ठेवावयाच्या आहे त्यांनी उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाशी संपर्क साधावा.
स्टॉल्स उपलब्ध
पुष्पमहोत्सवाच्या प्रांगणात नर्सरीचालक तसेच बाग-बगीचा साहित्याशी संबंधीत व्यावसायीकांसाठी सशुल्क स्टॉल उपलब्ध आहेत. स्टॉलचे बुकींग लवकरच सुरु करण्यात येईल. स्टॉल हवे असतील त्यांनी स्टॉल्सचे आरक्षण करावे. स्टॉल्सची संख्या मर्यादित असणार आहे. या पुष्पोत्सवात विविध गटातील स्पर्धेत पुष्पप्रेमी नागरिकांनी, शालेय विद्यार्थी मोठया प्रमाणात सहभाग घ्यावा. तसेच या प्रदर्शनास आवश्य भेट देवुन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी राजीव गांधी भवन येथील मनपाच्या उद्यान विभागाशी संपर्क करावा असे आवाहन उद्यान अधिक्षक विवेक भदाणे,नाशिक महानगरपालिका यांनी केले आहे.