इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे प्रस्थान करण्यापूवी मनोज जरांगे पाटील हे भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. आरक्षण मिळवण्यासाठीच मी मुंबईला जाणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी थांबणार नाही. समाजाच्या लेकरांना न्याय मिळावा, म्हणून ही निकराची लढाई लढत आहोत. मी असलो, नसलो तरी विचार जागे ठेवा, असे सांगताना जरांगे पाटील भावुक झाले होते. सरकारला मराठा आरक्षणासाठी समाजाने सात महिने वेळ दिला. परंतु आरक्षण मिळाले नाही असेही त्यांनी सांगितले.
जरांगे पाटील आज मुंबईसाठी अंतरवाली सराटी येथून निघणार आहेत. पूर्वी त्यांनी २६ जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा दिला होता; परंतु आंतरवाली सराटीपासून उपोषण करण्याच्या तयारीत आपण आहोत, असे सांगताना समाजाला विचारून निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. .
जरांगे पाटील यांनी आता माध्यमांशी संवाद साधताना निर्वाणीचा पवित्रा घेतला. आता छातीवर गोळ्या लागल्या, तरी माघार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. समाजासाठी बलिदानाची तयारी आहे, असे ते म्हणाले. यावेळे ते म्हणाले की मी एकटा निघालो, तरी मुंबईमध्ये कोट्यवधी लोक जमा होतील. आम्ही सर्व बाजूंनी लढणार आहोत. आरक्षणासाठीची ही शेवटची लढाई आहे.