इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहातील एक फोटो समोर आला आहे. या फोटोच्या निमित्ताने रामभक्तांना रामलल्ला यांच्या अतिशय सुंदर मूर्तीचं दर्शन झाले आहे. या फोटोत रामलल्ला यांच्या हातात धुष्यबाणही दिसत आहे. गुरुवारी रामल्लांची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आली होती. त्यानंतर या मूर्तीचा फोटो समोर आला. त्यानंतर तो सोशल मीडियावरुन व्हायरल झाला.
मैसूरचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी रामलल्लांची मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती ५१ इंचाची आहे. या मूर्तीला १८ जानेवारी रोजी सकाळी मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आले होते. कमळच्या फुलात विराजमान झाल्यानंतर या मूर्तीची उंची ही ८ फूट इतकी होते. या मूर्तीचे वजन २०० किलोग्रामच्या आसपास आहे. या मूर्तीला काळ्या पाषाणातून साकारण्यात आले आहे.
श्रीरामाची ही मूर्ती गुरुवारी सकाळी गर्भगृहात विराजमान केली गेली. यावेळी श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि रामभक्त उपस्थित होते. मंत्रोच्चार करुन रामलल्ला यांना गर्भगृहात विराजमान करण्यात आले होतेय