मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्या य़ेथे होणा-या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्र सरकारने २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याअगोदर कालच केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या सोहळ्याचे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील हा निर्णय घेतला आहे.
अयोध्या य़ेथे होणा-या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे या उद्देशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.