इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोलापूर : भारतातील गोरगरिबांच्या सर्वांत मोठ्या गृहप्रकल्पाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बालपण आठवले. त्यांना भावना अनावर झाल्या. अश्रू आवरता आले नाहीत. अशा घरात मला लहानपणी राहता आले असते, असे म्हणत ते भावविवश झाले.
मोदी यांनी आज सोलापुरात कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या तीस हजार सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायटीचे लोकार्पण केले. त्यावेळी ते
जनतेशी प्रश्नरुपाने संवाद साधत होते. एक लाख लोकांचा गृहप्रवेश होणार असल्याने माझा आनंद वाढणार की नाही? सर्वजण आपल्या घरात राम ज्योती प्रजवलीत करणार की नाही? अशी विचारणा करीत आम्ही केलेला संकल्प पूर्ण होतोय यासारखा दुसरा आनंदाचा क्षण असू शकत नाही, असे मोदी म्हणाले. मला पण लहानपणी अशा घरात राहायला मिळाले असते, तर असे म्हणत त्यांचा कंठ दाठला. घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो. मोदींनी एक हमी पूर्ण केली. मोदी गॅरंटी म्हणजे काम पूर्ण होण्याची गॅरंटी असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलालाला आणि सिद्धेश्वर महाराजांना मी नमन करतो. २२ जानेवारीला ऐतिहासिक क्षण आहे. आपले प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होतील. मी ११ दिवस साधना करणार आहे. तुमच्या आशीर्वादाने मी तिकडे जातो आहे. माझ्या अनुष्ठानची सुरुवात महाराष्ट्राच्या नाशिकमधील पंचवटीतून झाली, अशी भाषणाला मराठीत सुरुवात केल्याने उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.