इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सटाणा – तालुक्यातील बहूप्रतिक्षित तळवाडे भामेर कालव्याचे काम अनेक वर्षापासून रखडले होते. मागील शासनाने सदर काम हे शासकीय मापदंडात बसत नाही म्हणून बंद केले होते, ह्या कालव्याला कुठलीही मंजुरी भेटणार नाही असे आदेश दिले होते. २०१५ मध्ये नवनिर्वाचित खासदार डॉ. सुभाष भामरे हे धुळे लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर खासदार भामरे यांनी सदर कालव्याच्या कामाचा स्थानिक लोकांच्या मदतीने पाठपुरावा सुरू केला. डॉ. सुभाष भामरे देशाचे संरक्षण राज्यमंत्री असताना राज्यात भाजपा सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या सहकार्याने या कामाची सुधारित तांत्रिक मान्यता करुन घेण्यात आली.
गेल्या २५-३० वर्षामध्ये रखडलेले तळवाडे भामेर पोहोच कालवा व हरणबारी डावा कालवा हे एकत्र दाखवून शासन स्थरावरून डॉ. सुभाष भामरे यांना ह्या कामाची मंजुरी घेण्यास यश संपादन झाले. २०१९ ला ह्या उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया झाल्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. २०१९ ला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सदर काम दोन वर्ष रखडले परंतु कोरोनानंतर कामाचा वेग वाढवून सदरचे काम आज रोजी पूर्णत्वास आले आहे.
गेल्या १५ दिवसापासून कालव्याची चाचणी घेण्यात येत होती, यावर्षी भयंकर दुष्काळ सदृश परिस्तिथी असल्याने मोसम नदीचे पाणी आटले होते हरणबारी धरणाचा पाणीसाठा कमी प्रमाणात होता.त्यामुळे कालव्याच्या चाचणी साठी अडचण येत होती परंतु मध्यंतरी पावसाचे उशिरा आगमन झाल्याने हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने धरणाचा पाणीसाठ्यात वाढ झाली व कालव्याची चाचणी घेण्यास सुरुवात झाली.
सदर कालवा अनेक वर्ष ओसाड असल्या कारणाने अनेक अडचणी होत्या परंतु त्याही दूर करण्यात आल्या आहेत. आणि आज रोजी कालव्याचे पाणी २७.५० किमी चा प्रवास करुन तळवाडे भामेर धरणात पोहचलेले आहे. आणि यामुळे अंतापूर,तहाराबाद,पिंपळकोठे,दरेगाव,नांदीन,सोमपुर, जायखेडा,वाडीपिसोळ, जयपूर,ब्राह्मणपाडे,तांदुळवाडी,श्रीपुरवडे,वडेखुर्द,उत्राणे ह्या गावांना प्रत्यक्ष फायदा झाला आहे.
हे धरण लवकरात लवकर भरावं यासाठी जलसंपदा विभागाकडे विनंती करण्यात येणार आहे , दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने धरणातील पाणीसाठ्यामुळे तळवाडे भामेर,वरचे टेंभे, खालचेटेंभे,इजमाने,बीजोरसे,मोराने,अंबासन तसेच काटवण भागातील काही गावांना विशेष फायदा होणार आहे. सदर धरणात पाणीपडावं म्हणून परिसरातील गावांतील लोक गेल्या२५-३० वर्षापासून प्रतीक्षा करत होते, आणि ते स्वप्न आज सत्यात उतरले पूर्ण झाल आहे.
सदर कालव्यासाठी शेतकरी, कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांनी पाठपुरावा केला त्यासर्वांमुळे तसेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या सहकार्याने आज माझ्या धुळे मतदारसंघातील सटाणा तालुक्यातील ४० गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे, या कामात माझा हातभार लागल्यामुळे मी खूप समाधानी आहे. सदर कालव्याची चाचणी झाल्यानंतर या कालव्याच्या ज्या छोट्या मोठ्या अडचणी असतील त्याप्रत्यक्ष्यात दिपावली नंतर दुरुस्ती करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिलेल्या आहेत.त्यामुळे पुढीलवर्षापासून कालवा पूर्ण क्षमतेने तळवाडे भामेर धरणापर्यंत पोहोचेल त्यासाठी शासन स्तरावरून गरजेची सर्व मदत करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले.
तळवाडे भामेर पोहोच कालव्याबरोबर केळझर डावा कालवा व केळझर चारी क्रमांक ८ ह्या दोघं कालव्याचे पाणी देखील अंतिम टप्यात म्हणजे कौतिकपाड्या जवळ पोहचलेले आहे. येत्या २-३ दिवसात हे पाणी देखील कौतिकपाडा गावात पोहोचेल आणि हया दोन कालव्यांचा फायदा २५-३० गावांना होणार असून मला ह्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे खा. डॉ सुभाष भामरे यांनी सांगितले.