नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मालेगावरोडवर चोंढी घाटाच्या पायथ्याशी एका अवघड वळणावर भरधाव बसने कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात झाला. यात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला तर बसमधील ७ प्रवासी जखमी झाले आहे.
मनमाडहून ही बस नंदुरबारकड़े जात असतांना सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी मालेगावच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या रस्त्यावर नेहमी अपघात होत असतात. घाट असल्यामुळे ब-याच वेळ वाहनचालकांना अंदाज येत नाही. या ठिकणी भरधाव वेगाने गाडी चालवणे धोक्याचे असतांना अनेक वेळा चालक ते करत नाही.