नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध विभागाने घोटी येथे मे. साईमेवा फुड अॅण्ड बेव्हरजेसवर छापा टाकून येथ कमीदर्जा. असुरक्षित पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरचा ४ लाख ४५ हजार ५९८ रुपयाचा साठा जप्त केला. या ठिकाणी संशयावरुन नमुने घेऊन पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरच्या एकुण २१ हजार ३२४ रुपयाचे पॅक बॉटल्स १ लिटरच्या, किंमतीच्या ४ लाख २६ हजार ४८८ रुपयाच्या व छापलेले लेबल्स, २६ रोल्स्, किंमत १९ हजार ११० रुपये असा एकुण ४ लाख ४५ हजाराचा ५९८ रुपयाचा इतक्या किंमतीचा साठा जप्त केला.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न), उ. सि. लोहकरे समवेत गो. वि. कासार, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी मे. साईमेवा फुड अॅण्ड बेव्हरजेस, जुना आग्रा रोड, मु.पो. घोटी, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे छापा टाकला असता त्याठिकाणी तपासणीअंती सदर पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरची निर्मिती ही विना बीआयएस प्रमाणपत्र तसेच आक्षेपार्ह लेबल असलेले, मिथ्याछाप व लेबलदोषयुक्त साठा आढळून आला.
सदरचे उल्लंघन हे कायदयानुसार आक्षेपार्ह असल्याने अन्न सुरक्षा अधिकारी कासार यांनी या कारवाईत घेतलेले नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांचेकडे पाठविण्यात आले. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई करण्यात असणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
नाशिक विभागातील सर्व पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटरचे उत्पादकांनी त्यांचेकडे त्यांचे स्थापित उत्पादन क्षमतेनुसारच राज्य केंद्र अन्न परवाना असल्याची तसेच विधीग्राहय बीआयएस प्रमाणपत्र असल्याची खातरजमा करुनच व्यवसाय करण्याचे आवाहन सं.भा. नारागुडे, सह आयुक्त (नाशिक विभाग) यांनी केले आहे. सदरची कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) उ. सि. लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांच्या पथकाने सह आयुक्त (नाशिक विभाग) सं.भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.