इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः आंब्याचा राजा असलेल्या कोकणच्या हापूस आंबा नेहमीच भाव खातो. त्याचे भावही चढेच असतात. पण, पहिल्या पेटीचे भाव दर सामान्यांच्या महिन्याचे बजेट पेक्षाही जास्त असते. आता पुण्यात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली असून तिला २१ हजार भाव मिळाला. याचा अर्थ एका अंब्याची किंमत ४४० रुपये आहे. दरवर्षी आंब्याची पहिली मुंबई-पुण्यात कधी येते आणि तिला भाव काय मिळतो, याकडे आंबा प्रेमींचे लक्ष असते.
बाजारात दरवर्षी डिसेंबरमध्येच आंबे येतात. त्यांचा भावही तसाच असतो. या वर्षी अतिवृष्टी, दुष्काळ आणि अन्य संकटांचा सामना करताना ही आंबा लवकर दाखल झाला असला, तरी सामान्यांच्या आवाक्यात कोकणचा आंबा यायला अजून किमान अडीच महिने तरी लागतील.
पुणे शहरात दाखल झालेल्या या हंगामातील पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीची किंमत २१ हजार रुपये इतकी आश्चर्यकारक होती. तर नव्या मुंबईतील वाशी येथे आंब्याच्या पेटीला १० ते १५ हजार रुपये इतका दर मिळाला आहे.