सोमवार, ऑगस्ट 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नवेली देशमुख या उपक्रमात सहभागी होणार

by Gautam Sancheti
जानेवारी 18, 2024 | 8:26 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 125

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी व्हावी याकरिता,माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख यांची सन २०२४-२५ या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. नवेली देशमुख या राज्यभरात ‘पर्यटन सदिच्छा दूत’ म्हणून राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी सहभागी होतील, पर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्ट‍िवल २०२४ मध्येही सहभागी होणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

पर्यटन मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. उत्कृष्ट प्राचीन मंदिरे, अजिंठा – वेरूळ सारखी इ.स. सन पूर्व दुसऱ्या शतकातील लेणी, वन्यजीव, थंड हवेची ठिकाणे, विविध धार्मिक स्थळे ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची स्थाने आहेत. राज्यात देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. हाच विचार घेऊन महाराष्ट्र शासन राज्यात समृद्ध आणि जबाबदार पर्यटन योजना राबवत आहे.

देशातील बहुतांश राज्यात पर्यटनाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबवून पर्यटकांना आकर्षित करण्यात येते. त्याकरीता अनेक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना सहभागी करून पर्यटन क्षेत्रातील विविध स्थळांची प्रसिद्धी करण्यात येत असते. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याची ‘ॲम्बेसेडर ऑफ यूथ टुरिझम’ म्हणून मिस इंडिया ठरलेली नवेली देशमुख यांची राज्य शासनाने राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे.

पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख या छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. नवेली या यूथ आयकॉन म्हणून विविध शासकीय विभागात योगदान देतील. राज्यातील पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी त्या पर्यटन विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध पर्यटन महोत्सव,रोड शो विविध कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत.पर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्ट‍िवल २०२४ मध्येही प्रचार व प्रसिध्दीसाठी सहकार्य करत आहेत.

पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख आपल्या निवडीबाबत म्हणाल्या की, राज्यातील पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी मी प्रयत्न करेन. नव्या पिढीची आयकॉन म्हणून काम करताना युवा पिढीला साजेसे प्रचाराचे उपक्रम पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतील. शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक पर्यटनाला महत्व देण्यासाठी तसेच जबाबदार पर्यटनाची प्रसिध्दी करणार आहे. पर्यटन विभागातर्फे आयोजित केल्या जात असलेल्या मुंबई फेस्ट‍िवल २०२४ मध्येही मी सहभागी असून नऊ दिवस चालणाऱ्या या उपक्रमांचा जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दहा विभागाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतला आढावा

Next Post

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त राजधानी नवी दिल्लीत ग्रंथप्रदर्शन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
New Delhi News 1140x570 1 e1705590547688

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त राजधानी नवी दिल्लीत ग्रंथप्रदर्शन

ताज्या बातम्या

Untitled 4

भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी मिळवला थरारक विजय

ऑगस्ट 4, 2025
accident 11

धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी…चालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना, गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

ऑगस्ट 4, 2025
SUPRIME COURT 1

ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागरचेनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका

ऑगस्ट 4, 2025
fire 1

मेणबत्ती पेटवित असतांना गंभीर भाजलेल्या ८४ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू

ऑगस्ट 4, 2025
rape

एकतर्फी प्रेमातून एकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011