नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. बुधवारी वेगवेगळय़ा भागात राहणा-या तीघांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहे. तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत गंगापूर, सातपूर वअंबड पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना औद्योगीक वसाहतीतील सावित्रीनगर भागात घडली. विकास अशोक राशिनकर (३८ रा. यश अपा.फडोळ मळा) यांनी बुधवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.
दुस-या घटनेत गंगापूररोड भागातील रमेश गणपत नवले (४५ रा.गंगोत्री अपा.प्रसाद सर्कल) यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या घरातील बाथरूम भागात छताच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक गवे करीत आहेत.
तिसरी घटना सातपूर परिसरात घडली. किशोर प्रकाश शार्दुल (३० रा.सिध्दार्थ चौक,स्वारबाबानगर) यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात भिंतीच्या हुकाला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही घटना समोर येताच त्याचे काका प्रमोद शार्दुल यांनी त्यास तातडीनने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.