नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या पाच मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी भद्रकाली, मुंबईनाका, इंदिरानगर, सातपुर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळारोडवरील द्वारका नगरी भागात राहणारे अक्रम इसाक शेख हे गेल्या शुक्रवारी (दि.१२) मेनरोड भागात गेले होते. गाडगे महाराज पुतळा परिसरातील हॉटेल स्वागत समोर त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ डीएच ४२२४ पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत. दुसरी घटना मुंबईनाका परिसरातील श्रीहरी कुटे मार्गावर घडली. याबाबत अनुप जयप्रकाश लुणावत (रा.रविंद्र हायस्कूल जवळ,द्वारका) यांनी तक्रार दाखल केली आहे. लुनावत सोमवारी (दि.१५) श्रीहरी कुटे मार्ग भागात गेले होते. बिजनेस बे येथील पार्किंगमध्ये त्यांनी आपली ड्रीम युगा एमएच १५ एफडब्ल्यू ९९३७ दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बहिरम करीत आहेत.
तिसरी घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. निलेश मुरलीधर जगताप (रा.माळी कॉलनी,श्रमिकनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जगताप यांची दुचाकी एमएच १५ सीबी ८०३६ बुधवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास त्यांच्या घराच्या गेटजवळ लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार केदारे करीत आहेत.
चौथी घटना सदिच्छानगर भागात घडली. याबाबत पार्थ शंतनू सोनवणे (रा.चैत्र निर्मल अपा.सदिच्छानगर) यांनी तक्रार दिली आहे. सोनवणे यांची प्लॅटीना एमएच १५ सीएफ ५२६८ गेल्या शुक्रवारी (दि.१२) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत. तर सिध्दार्थ भिमराव पगारे (रा.हरिसंस्कृती अपा. खर्जुलमळा) यांची शाईन एमएच १५ एफबी ९७१८ दुचाकी गेल्या ५ जानेवारी रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या आवारात लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार ठेपणे करीत आहेत.