इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हिंगोली शहरातील काही समाजकंटकांकडून जाणूनबुजून जिओ केबल कापून नेटवर्कला अडथळा आणल्याचे प्रकार समोर आला आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या घटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जाणूनबुजून काही समाजकंटकांकडून खोडकरपणे असे प्रकार केल्याने सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत. कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रकरणी हिंगोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. नेटवर्कला अडथळा आणण्याचे प्रकार हिंगोली शहर तसेच परिसरात केल्याने ऑनलाईन सेवा ठप्प झाल्याने सर्व सामान्य ग्राहक, विद्यार्थी यांची मात्र मोठी अड्चण झाली. कंपनीने कोट्यवधी रुपये गुंतवून उभारलेल्या नेटवर्कची नासधुस केल्याने नियमित रिचार्ज करत असलेल्या ग्राहकाना मनस्ताप होत आहे.
नुकत्याच आलेल्या टेलीकॉम पॉलिसीमध्ये टेलिकॉम ही अत्यावश्यक तसेच शासकीय सेवेत समाविष्ट केली असून या सेवेत अडथळा आणल्यास कडक कारवाईची तरतूद केली आहे. आरोपींकडून हिंगोली शहरातील विविध भागात केबल कट करणे, नेटवर्क सामग्रीची नासधूस करणे, अत्यंत महाग अशी केबल चोरून नेणे असे समाजविघातक प्रकार करण्यात आले. ग्राहकांच्या तक्रारींची दाखल घेऊन जीओच्या फिल्ड इंजिनिअर्सकडून दिवस रात्र अथक परिश्रम करून नेटवर्क सुरळीत ठेवले गेले. दुरुस्ती करणाऱ्या कंपनीच्या नेटवर्क इंजिनिअर्सला धमकावले देखील जात आहे. कंपनीने या गंभीर प्रकारांची दखल घेऊन ग्राहकांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी तसेच समाजविघातक कृत्यांना आळा घालणयासाठी शेवटी तक्रार दाखल केली.
एकीकडे सगळ्यांना उत्कृष्ट स्पीडसह नेटवर्क हवे आहे. तर याच वेळी काही समाजविघातक घटक नेटवर्कची नासधूस करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ग्राहक जीओला जबाबदार धरत असून वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे. टॉवर आहेत परंतु नेटवर्क नसल्याची ओरड केली जाते. बऱ्याच ठिकाणी टॉवरची बॅटरी चोरून नेणें, डिझेल चोरी, केबल चोरून नेणे असे प्रकार देखील सतत घडत असून यावेळी स्थानिक ग्रामस्थ, प्रशासन, तसेच पोलिसांनी लक्ष घालण्याचे गरजेचे असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.