नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड परिसरातील भीमनगर येथे वीजचोरीचा प्रकार समोर आला आहे. घरगुती वापरात ही चोरी करण्यात आली असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन शांताराम जाजू (रा.कैलासजी हौ.सोसा.पाण्याच्या टाकीसमोर जेलरोड) असे वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने सर्वत्र वीज चोरीचा शोध घेतला जात आहे. नाशिकरोडचे पथक जेलरोड भागात तपासणी करीत असतांना ही वीज चोरी उघडकीस आली.
सचिन जाजू यांच्या घरगुती वीजमिटरमध्ये फेरफार करून गेल्या सहा महिन्यांपासू चोरी होत असल्याची बाब समोर आली असून याप्रकरणी सहाय्यक अभियंता हनुमंत आडोळे यांनी दिली आहे. अधिक तपास हवालदार फड करीत आहेत.