नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॅनलरोड भागात अज्ञातांनी कारसह दुचाकी ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. शहरात वाहनजाळपोळीच्या घटना पुन्हा वाढल्या असून शनिवारी ही घटना घडली. जेलरोड परिसरातील या घटनेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिमराव चिंतामण सोनवणे (रा.कनिष्क बंगलो,श्रीरंग सोसा. मंगलमुर्ती नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे यांची लोगन कार व दुचाकी शनिवारी रात्री त्यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना अज्ञात माथेफिरूने ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिल्या.
ही बाब वेळीच निदर्शनास आल्याने दुर्घटना टळली मात्र या घटनेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.