इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सिन्नर तालुक्यातील निमगाव येथे बिबट्या गुरुवारी रात्री पिंज-यात जेरबंद झाला आहे. वनपरिक्षेत्र सिन्नर यांनी लावलेल्या पिंज-यात तो ट्रप झाला आहे. निमगाव येथील संजय पुंजा टोक यांच्या शेतात हा पिंजरा लावण्यात आला होता. जेरबंद झालेला हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे अंदाजे वय एक ते दीड वर्ष आहे.
गेल्या काही दिवसापासून बिबट्या या भागात धुमाकूळ घालत असल्यामुळे शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
वनविभागाचे उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक पंकज कुमार गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक पवार साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर (प्रा.) मनीषा जाधव यांचे मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमचे सिन्नर येथील वनपाल एस.एम.बोकडे, श्रीमती व्ही टी कांगणे, मधुकर शिंदे, रोहित लोणारे, रवी चौधरी यांनी जेरबंद झालेल्या बिबट्याची वैद्यकिय तापसणी केली. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे मोहदरी (माळेगाव) वन उद्यान येथे नेले आहे.