इंडिया दर्पण वृतसेवा
दावोस येथे सुरू असलेल्या ५४ व्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘महाप्रित’ आणि ‘ग्रीन एनर्जी ३०००’ यांच्यात ४० हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या करारांतर्गत राज्यातील सौर ऊर्जा धोरणाला अनुसरून सौर ऊर्जा पार्क, पवन ऊर्जा, हायब्रीड पॉवर प्लांटस उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात एक हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असून ही क्षमता सोलर, हायब्रीड एनर्जी आणि बॅटरी एनर्जी स्टोरेजच्या सहाय्याने १० हजार मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
‘महाप्रित’ चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे यांनी या करारावर स्वाक्षरी केली.