इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंदिगड: चंदीगडच्या महापौरपदासाठी आज निवडणूक होणारी निवडणूक लांबणीवर पडली आहे. पीठासन अधिकारी आजारी पडल्याचे सांगत ही निवडणूक टाळण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारी चंदीगडच्या महापौरपदाची निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत इंडिया आघाडीसोबत भाजपचा पहिला सामना होणार होता. पण, तो टाळण्यात आला आहे.
चंदीगड महापौर निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने हातमिळवणी करून भाजपचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे ही निवडणूक रंजक बनली आहे. ‘आप’चे उमेदवार कुलदीप कुमार हे भाजपच्या मनोज सोनकर यांच्या विरोधात लढत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी चंदीगडच्या महापौरपदाची निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जात आहे. ‘आप’चे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा म्हणतात, की ‘इंडिया’ आघाडी आपला पहिला सामना खेळणार आहे. ही निवडणूक देशाच्या राजकारणाचे नशीब, चित्र, दशा आणि दिशा बदलणार आहे. चंदीगडच्या महापौरपदाची निवडणूक लोकसभा निवडणुकीची पायाभरणी करणार आहे. ‘इंडिया’आघाडीचा विजयी रथ चंदीगड येथून निघणार आहे.
पंजाबमधील काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे नेते कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्यास तयार नाहीत. चंदीगडमध्ये काँग्रेस-‘आप’ युती जिंकल्यास, दोन्ही पक्ष युती करण्याचा विचार करू शकतात. हरियाणातही अशीच परिस्थिती आहे. चंदीगड ही पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी असून चंदीगडमध्ये युती यशस्वी झाली, तर त्याचा परिणाम पंजाब आणि हरियाणामध्ये नक्कीच दिसून येईल. २०१६ पासून चंदीगड महापालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. चंदीगड महापालिकेच्या निवडणुका गेल्या आठ वर्षांपासून निवडणुका जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी ‘आप’ आणि काँग्रेसने आघाडी केली असून या वेळी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने आपला महापौर करण्यासाठी व्यूहनीती आखली आहे. काँग्रेस-‘आप’ युतीअंतर्गत महापौरपदासाठी ‘आप’चा उमेदवार असून उपमहापौरपदासाठी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात आहेत.
या महानगरपालिकेत ३५ सदस्य संख्या असून आपकडे आप १३, काँग्रेस ७, अकाली दल १ नगरसेवक आहे. त्यामुळे २० संख्या होते. भाजपकडे १४ नगरसेवक आहे. निवडणूक जिंकण्यासाठी १९ नगरसेवकांची संख्या हवी असल्यामुळे ही इंडिया आघाडीकडे आहे. पुरेस संख्याबळ इंडिया आघाडीकडे असल्यामुळे भाजपने ही निवडणूकच टाळली आहे.