नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील त्रिप्रयार येथील श्री रामास्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी पंतप्रधानांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली तसेच कलाकार आणि बटूकांचा सत्कारही केला.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर पोस्ट केले :“त्रिप्रयार येथील श्री रामास्वामी मंदिरात प्रार्थना केली. मल्याळममध्ये श्री अध्यात्म रामायणातील श्लोक आणि इतर भजने देखील खूपच श्रवणीय होती.”