नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणा-या ५७ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिलीप रामदास सोनवणे (रा.ध्रुवनगर पाण्याच्या टाकीजवळ,शिवाजीनगर) असे मृत इसमाचे नाव आहे. सोनवणे यांनी मंगळवारी (दि.१६) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते.
ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक हिंडे करीत आहेत.