मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोलापूरच्या (महाराष्ट्र) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा खटल्यातील विशेष न्यायाधीशांनी सोलापूरच्या कुर्डुवाडी येथील राखीव पोलीस दलाचे तत्कालीन कॉन्स्टेबल गणेश सातपुते याला पाच वर्षे सक्तमजुरीसह ४ हजार ५०० रुपये दंड ठोठावला.
सीबीआयने या आरोपीविरुद्ध २९ एप्रिल २०१३ रोजी गुन्हा दाखल केला होता. आरोपीने टूर अँड ट्रॅव्हल कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून १० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. तसेच या कंपनीने बुक केलेल्या रेल्वे तिकिटांवर प्रति प्रवासी १०० रुपये लाच मागून ती स्वीकारल्याचाही आरोप आरोपीवर आहे.
तपासाअंती आरोपीविरुद्ध ६ ऑगस्ट २०२३ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.