मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जर केली नसती सुरत गुवाहाटी…तर कशाला झाली असती दाटीवाटी असे सांगत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याची सध्या चांगलीच चर्चा आहे.
या व्हिडिओमध्ये एका गाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन हे दिसत आहे. या गाडीत थोडी दाटी झाल्यामुळे सुषमा अंधारे यांनी त्यावर निशाणा साधला आहे.
अवघ्या दोन ओळी लिहीत त्यांनी महायुतीच्या या नेत्यांवर निशाणा साधला. सध्या महायुतीत तीन पक्ष एकत्र आल्यामुळे येथे गर्दी झाली आहे. ही गर्दी अशीही चर्चेत आहे. त्यामुळे अंधारे यांनी टाकलेला हा व्हिडिओ चिमटा घेणारा असाच आहे.