नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई आग्रा महामार्गावर सायंकाळी ५ वाजता पाडळी फाट्याजवळ जवळ रिक्षा पलटी झाली. नाशिककडून मुंबई ही रिक्षा जात असतांना हा अपघात झाला. यात दोन जण जखमी झाले आहे.
या अपघातात संतोश अंबादास काळे (३४), ऋषी व्यवहारे (२५) रा. घोटी हे जखमी झाले. या अपघातामध्ये MH.15. FU 4326 ही रिक्षा पलटी झाली होती.
या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर जखमींना तात्काळ घोटी येथील ग्रामीण रुग्णालयातमध्ये दाखल करण्यात आले.