इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – पाच राज्यांच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. नवी दिल्लीत आज काँग्रेस महासमीतीची बैठक झाली. त्यानंतर काँग्रेस नेता राहुल गांधीसह काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत येणा-या निवडणुकीत जातीय जनगणना हा विषय प्रमुख मुद्दा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले की, भाजपच्या १० मुख्यमंत्र्यांपैकी १ मुख्यमंत्री ओबीसी आहे आणि तोही काही दिवसांनी मुख्यमंत्री होणार नाही. पंतप्रधान मोदी ओबीसींसाठी काम करत नाहीत, ते फक्त ओबीसी वर्गाचे लक्ष दुसरीकडे वळवतात. आज दोन भारत निर्माण होत आहेत. एक अडाणीचा आहे, दुसरा सर्वांचा आहे.
त्यामुळे जातीवर आधारित जनगणनेनंतर आम्ही ‘आर्थिक सर्वेक्षण’ही करणार आहोत. भारताच्या भविष्यासाठी जातिगणना आवश्यक आहे. जातीय जनगणनेनंतर विकासाचा नवा मार्ग खुला होणार आहे. हे काम काँग्रेस पूर्ण करणार आहे. लक्षात ठेवा… जेव्हा आपण वचन देतो तेव्हा आपण ते मोडत नाही असेही ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले की, इंडिया आघाडीचे अनेक पक्ष जातीवर आधारित गणनेचे समर्थन करतील. एक-दोन पक्षांचे मत वेगळे असू शकते, पण बहुतेक पक्ष त्याला पाठिंबा देतील.
बघा संपूर्ण पत्रकार परिषद….