चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– तालुक्यातील दुगाव येथील जमीन व्यावसायिक राजू शिंदे यांचा चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. जमीन व्यावसायिक ४५ वर्षीय राजू शिंदे यांच्या छाती, मांडी, मानेवर चाकूने निघृण वार करण्यात आले.
या घटनेत गंभीर जखमी शिंदे यांना सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, त्यांना मृत घोषित केले. राजू शिंदे हे नावाजलेले व्यावसायिक होते. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
हत्या करणाऱ्या संशयितांच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले असून पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चांदवड पोलीस स्थानकात विविध कलमान्वये १० व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.