इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अर्जेंटीनाचा स्टार फूटबॉलपटू लिओनेल मेस्सी हाच यंदाचा सर्वोत्कृष्ट फीफा खेळाडू ठरला आहे. तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा मान स्पेनच्या ऐताना बॉन्माटीला मिळाला.
लंडनमधे फीफा पूटबॉल पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. मेस्सीबरोबर अर्लिंग हालँड आणि किलियन एम्बापे हे दोन खेळाडू या स्पर्धेत होते. मात्र मेस्सीलाच चाहत्यांची सर्वाधिक पसंती मिळाल्यामुळे गेल्या ४ वर्षांत तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट फीफा खेळाडूचा मानही त्याला मिळाला. फीफाचे इतर पुरस्कारही या समारंभात वितरित करण्यात आले.