येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात तीन दिवस मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा करण्यात आला. राजकीय नेत्यांनी आपल्या पतंग उडवल्या. करीच्या दिवशी पतंगोत्सवाला अधिक उधाण आले होते. संध्याकाळी पतंगोत्सवाला अलविदा करत येवल्यात दिवाळी सारखा जल्लोष करण्यात आला.
ठिकठिकाणी पतंगोत्सवा नंतर आकाशात दिवे सोडले तर कोणा आकाशात फुटणारे फटाके फोडत पतंगोत्सवाची सांगता केली. यावेळी संपूर्ण येवला शहरातील लहानां पासून मोठ्या पर्यंत नागरीकांनी आपल्या इमारतीवर जात दिवाळी प्रमाणे फटाके फोडत मकर संक्रांतीच्या तीन दिवस चालणा-या पतंग उत्सवाची सांगता केली.