नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या पाच मोटारसायकली चोरट्यांनी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी भद्रकाली, पंचवटी, मुंबईनाका, अंबड व नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिली घटना उंटवाडी भागात घडली. भालचंद्र यादवराव ठाकरे (रा.जयपार्क कालीकानगर) यांची डिस्कव्हर एमएच १५ डीई ६३२५ दुचाकी गेल्या गुरूवारी (दि.११) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत. तर दुस-या घटनेत जगवेंदरसिंग मेहंदरसिंग भट्टी (रा.गुरूद्वारासमोर,नाशिक रोड) हे रविवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास नाशिकरोड येथील मालधक्का भागात गेले होते. मुन्ना किराणा दुकानासमोर लावलेली त्यांची एमएच १५ ईआर ४७९६ दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
तिस-या घटनेत रमेश प्रभाकर भगत (रा.साईबंधन अपा.इंदिरानगर) हे रविवारी (दि.१४) गोदाघाटावर गेले होते. यशवंत मदिराच्या बाजूला त्यांनी आपली पॅशन एमएच १५ ईडी ४१२२ दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.
चोथी घटना भद्रकालीतील पिंपळचौकात घडली. राकेश तुकाराम परदेशी (रा.पिंपळचौक) यांची मोटारसायकल एमएच १५ सीबी ४९४० गेल्या १८ डिसेंबर रोजी त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना गणेश रमेश पाटील (रा.औरंगाबादरोड) याने पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार साळुंके करीत आहेत. पाचवी घटना गडकरीचौक भागात घडली. सलमान समद खान (रा.मेहबुबनगर वडाळागाव) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. खान रविवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास गोल्फ क्लब मैदानावर गेले होते. एलआयसी ऑफिसच्या गेट जवळ लावलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ जीएच २८५० चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बहिरम करीत आहेत.