इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एटीएम लुटण्याच्या प्रयत्नात २१ लाखांहून अधिक रुपये जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास घडली. चोरट्यांनी ही चोरी करण्यासाठी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि रेकॉर्डिंग उपकरणेही नष्ट केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावर ही घटना घडली. या घटनास्थळी गॅस कटर आणि इतर साधने सापडले आहे. चोरी करतांना मशीनला आग लागल्याचे बोलले जात आहे. ही चोरी करण्यासाठी अगोदर एटीएमचे शटरचे कुलूप तोडले. यानंतर मशीनमधील रोकड काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. त्यावेळेसच ही आग लागली असल्याचा संशय आहे.
मशीनमध्ये कॅश रिफिलचे काम पाहणाऱ्या कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी मशीन उघडले. त्यानंतर रोख रक्कम जळून तिची राख झाल्याचे दिसली. ही रक्कम २१ लाख ११ हजार आठशे रुपयांची रोकड असल्याचे तपासात समोर आले आहे.