इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे प्रत्येक पक्ष आपली जोरदार तयारी करत आहे. त्यात राज्यात महायुती व महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्यामुळे यातील घटक पक्ष किती जागा लढणार यावर नेहमी चर्चा होते. दरम्यान धक्कादायक फार्मूलाच आता समोर आला असून त्यात भाजप ३२, शिंदे गट १० व अजित पवार यांचा गट ६ जागा लढवणार असल्याचे बोलले जात आहे.
आतापर्यंत आलेल्या फार्मूलामध्ये भाजप २६ तर शिंदे व अजित पवार गट २२ जागा लढवणार असल्याचे बोलले जात होते. पण, आता ४८ जागांपैकी ३२ जागा भाजपला लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे फार्मूलामुळे शिंदे गट व अजित पवार गटांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नेहमी महायुतीचा फार्मूला सांगतांना त्यांनी विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याची परंपरा असली तरी त्यांच्या एकुण कामाबाबत त्यावर चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे अनेक विद्यमान खासदारांची दांडी उडणार असल्याचे बोलले जात आहे.
देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकालात भाजपने तीन राज्यात सत्ता मिळवली. त्यानंतर अयोध्या सोहळा व एकुणच मोदी सरकारने घेतलेले निर्णय यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपने आपल्या जागा वाढवल्या असल्याचे बोलले जात आहे. एकुणच ही चर्चा खरी ठरल्यानंतर महायुतीचे नेते काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे असणार आहे.