इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – कौटुंबिक हिंसेचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सासरच्यांकडून सूनांवर, वृद्ध महिलांवर सातत्याने अत्याचार वाढत आहेत. यात आता ठाण्यातील एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. या घटनेचा व्हिडियो व्हायरल होत असून यामध्ये एक महिला आपल्या सासूला मारहाण करताना दिसत आहे.
या व्हिडियोमधीस दृष्यानुसार, ठाण्यामध्ये एक क्रूर महिला आधी जाऊन दरवाजा उघडते. नंतर ती अत्यंत क्रूरतेने वृद्ध महिलेला जमनीवर पाडते आणि तिला खेचत दरवाजाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. यादरम्यान तिची वृद्ध सासू वेदनेने रडत जमिनीवर पडलेली व्हिडीओत दिसत आहे. ठाण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सीसीटीव्ही फुटेज शेअर केला आहे. कोमल ललित दयारामणी असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, कापूरबावडी येथे काम करतात. कोपरी पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही एफआयआर नोंदवली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत ठाणे शहर पोलिसांनी याप्रकरणी आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला वृद्ध महिलेला शिवीगाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ती सासूला घर सोडायला सांगताना दिसत आहे. प्रत्युत्तरात वृद्ध महिलेने तिलाही शिवीगाळ केली. शाब्दिक भांडणामुळे सुनेला राग येत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
मदत करण्याचे सौजन्य नाही
हा संपूर्ण प्रकार घडत असताना स्वयंपाकघरात आणखी एक महिला उभी आहे, जी हे संपूर्ण नाटक पाहत आहे. परंतु ती वृद्ध महिलेच्या मदतीला येत नाही. सीसीटीव्ही फुटेजची तारीख पाहता ही घटना १४ सप्टेंबर रोजी घडल्याचे दिसून येते. मात्र नुकताच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ठाणे पोलिसांचे लक्ष वेधलं गेलं आहे. पण, हा व्हिडोओ क्ररतेचा असल्यामुळे तो दाखवू शकत नाही.