इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पालघर : विद्यार्थ्यांना मारहाण करणा-यावरुन नेहमी पालक व शिक्षकात वाद होतात. त्यामुळे आता हे वाद टाळण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. असे असतांना मोखाडा तालुक्यातील कारेगावमध्ये विद्यार्थ्यांला मारहाण केलेल्या एका घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या मारहाणीचे कारण दोन लाडू घेतले हे आहे.
कारेगाव येथील शासकीय आश्रम शाळेत हा प्रकार घडला. या गावातील या शाळेत दोन लाडू घेतले म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याला बेशुद्ध पडेपर्यंत काठीने मारहाण केली. त्यानंतर मारहाण करणाऱ्या शिक्षकांविरोधात तक्रार करू नये म्हणून, विद्यार्थ्याच्या आई वडिलांवर शिक्षकांकडून दबाव आणण्यात आला.
या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा मुलगा नववीत असून त्याचे नाव रुद्राक्ष दत्ता पागी असे आहे. मारकुट्या शिक्षकाचे नाव ललित अहिरे आहे. रुद्राक्ष जेवण घेण्यासाठी गेला, तेव्हा त्याने दोन लाडू घेतले. त्यानंतर शिक्षकाने संताप व्यक्त करत रुद्राक्षला बेदम मारहाण केली.