नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने दुचाकी पळवणारी दुकलीला गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल १३ लाख ३५ हजार रूपये किमतीच्या १७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्यात बुलेट, अव्हेंजर, शाईन,पल्सर व मोपेड दुचाकींचा समावेश आहे.
विशाल मधुकर धांडे (३८ रा.महादेव मंदिराजवळ,केवलपार्क) आणि मोहन शालिग्राम ढाके (३७ रा.ओमकारेश्वर मंदिराजवळ,स्वामीनगर अंबड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
युनिटचे हवालदार गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चोरटे चोरलेली बुलेट विक्रीसाठी येणार असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी अंबड औद्योगीक वसाहतीत सापळा लावला होता. बुलेटसह दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी अंबड हद्दीत गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलीस तपासात त्यांनी शहरातील अंबड,सातपूरसह आडगाव,गंगापूर,इंदिरानगर,सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याचे पुढे आले असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या सुमारे १३ लाख ३५ हजार रूपये किमतीच्या १७ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई निरीक्षक रणजीत नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदेश पाडवी,जमादार यशवंत बेंडकोळी,बाळू शेळके,हवालदार गुलाब सोनार,प्रशांत वालझाडे,शंकर काळे,चंद्रकांत गवळी,विजय वरंदळ,सुनिल आहेर,नंदकुमार नांदुर्डीकर,प्रकाश भालेराव,संजय सानप,प्रकाश बोडके,परमेस्वर दराडे,राजेंद्र घुमरे,मधुकर साबळे,अतुल पाटील पोलीस नाईक नितीन फुलमाळी,अंमलदार प्रविण वानखेडे आदींच्या पथकाने केली.