इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सचे प्रवासी विमानतळावर जमिनीवर बसून जेवण करत असतानाचा व्हिडीओ सध्या ‘सोशल मीडिया’वर चांगलाच व्हायरल झाला आहे. खरं तर रेल्वे उशीरा आली तर प्लॅटफॅार्मवर जेवण करतांना आपण बघतो. पण, थेट विमानतळावरचे हे चित्र मात्र दुर्मिळच आहे.
गोव्याहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान ऑपरेशनल अडचणींमुळे मुंबईला वळवण्यात आले. विमान मुंबईला आल्यानंतर प्रवाशांवर जमिनीवर बसून जेवण्याची वेळ आली. विमानतळाच्या सूत्रांकडून विमान मुंबईला वळवल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला. रात्रीची वेळी शेजारी इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाच्या शेजारी काही लोक विमानाजवळच बसून जेवण करीत आहेत.
१४ जानेवारी रोजी गोवा ते दिल्ली येथे इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E2195 ला दिल्लीत दृश्यमानता कमी असल्याने मुंबईला वळवण्यात आले. इंडिगोने या त्रासाबद्दल प्रवाशांची माफी मागितली आहे. सध्या या घटनेची चौकशी केली जात आहे.