मुंबईत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची महापत्रकार परिषद वरळीतील डोम सभागृह येथे सुरु झाली आहे. यावेळी कायदेतज्ञ उपस्थितीत आहे. ते सुध्दा नार्वेकर यांच्या निकालावर भाष्य करणार आहे. आजची पत्रकार परिषद हे एक जनता न्यायालय आहे. या पत्रकार परिषदेला कार्यकर्ता आणि सर्वसामान्य जनता उपस्थित आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर मुद्दे, शिवसेनेच्या २०१८ मध्ये झालेल्या घटनेतील बदलाची माहिती आणि त्यासंबंधीची कागदपत्रे ठाकरे गटाकडून समोर ठेवली जाणार आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल कागदपत्रांचे पुरावे दिले जातील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुखांचे अधिकार, पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची २०१३ मध्ये झालेल्या निवडीचे पुरावे या पत्रकार परिषदेत दिले जाणार आहेत. नार्वेकर २०१३ मध्ये शिवसेनेत होते आणि या पक्षप्रमुख निवडीच्या वेळी ते उपस्थित होते, याचा पुरावा दाखवला जाईल. २०१२ ते २०१३ या दशकभरात झालेल्या प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकांचे व्हिडीओ दाखवले जाणार आहेत.
तर बघा ही महा पत्रकार परिषद लाईव्ह