मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे भिकारीला मालक म्हणून उभे करून केली जमीन हडप केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी २४ तासात आरोपीला गजाआड करुन कारवाई केली आहे.
अशरफ तनवीर शब्बीर हकीम (६५) रा. ताशकंद बाग मालेगाव यांच्या मालकीची मालेगाव सोयगाव येथील जमीन प्लॉट जवळ पास ८ जणांनी बेकायदेशीररित्या हडप केली होती. त्यानंतर या प्रकरणी तक्रार झाल्यानंतर ही कारवाई पोलिसांनी केली.
या आरोपींनी प्लॉट मालक म्हणून भिकारी उभा करुन जमीन आपल्या नावावर केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला व २४ तासात संशयित आरोपींना छावणी पोलिसांनी अटक केली. मिळकती बाबत व्यवहार करतांना सत्यता पारखून व्यवहार करावा खोट्या व्यवहारांपासून सावध रहावे असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे..