येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे तीन दिवसाचा पतंग महोत्सव साजरा होत असतांना संध्याकाळच्या सुमारास शहा कॉलनी परिसरात पायी जात असतांना आयेशा अन्सारी या चार वर्षीय मुलीच्या पायात नायलॉन मांज्या अडकून तिच्या पायाला खोलवर जखम झाली.
या घटनेनंतर या लहान मुलीला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी तिच्यावर उपचार करण्यात येऊन पायाला पाच टाके टाकण्यात आले आहे. नायलॉन मांज्यावर बंदी असतांना त्याचा खुलेआम वापर होत असतांना त्यावर कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.









