बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कावनईच्या भारती व भाऊसाहेब रण यांच्याशी साधला संवाद…

जानेवारी 15, 2024 | 7:44 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
unnamed 2024 01 15T193902.190 e1705328025713

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कावनई येथील रहिवासी व पिंप्री सदो येथील एकलव्य विद्यालयातील नववीतील विद्यार्थिनी कु. भारती रण व तिचा शिक्षक भाऊसाहेब रण या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. निमित्त होते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान अर्थात पी. एम. जनमन अंतर्गत योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साधलेल्या संवादाचे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रधानमंत्री मोदी यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी एकलव्य विद्यालयांचा लाभ घेऊन एकलव्य विद्यालयांच्या माध्यमातून त्यांची स्वप्ने पूर्ण करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण तथा जनजातीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, आदिवासी सहकारी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, नाशिक प्रकल्प अधिकारी जतिन रहमान, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, गट विकास अधिकारी सोनी नाखाडे यांच्यासह कावनईचे ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी कु. भारती रण व भाऊसाहेब रण यांना मिळालेल्या शैक्षणिक योजनांच्या लाभाबाबत विचारणा केली. तसेच पी. एम. जनमन अंतर्गत लाभ मिळालेल्या अन्य योजनांबद्दलही माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एकलव्य विद्यालयांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. कातकरी समाजातील लाभार्थी गोकुळ देवराम हिलम मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेसह अंत्योदय रेशन कार्ड, वनधन योजनेंतर्गत वनधन केंद्राला मान्यता मिळाली आहे. त्यासाठी त्यांनी शासनाचे आभार मानले.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, अतिमागास भागातील आदिवासी बांधवाना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांच्या मुलांना उत्तम गुणवत्तेच्या शिक्षणासाठी एकलव्य विद्यालयाच्या माध्यमांतून प्रयत्न होत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेतून वंचितांपर्यंत योजना पोहोचविल्या जात आहेत. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सिकलसेल आजारावर वेळीच औषधोपचार करून त्याबाबत जनजागृती करण्यात यावी. रामजन्म भूमी पूजनाच्या माध्यमातून मंदिर स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पोहचवून त्यासाठी सर्वांनी काम करावे, असेही त्यांनी आवाहन केले.

आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य: डॉ. विजयकुमार गावित
आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले की, पी. एम. जनमन महा अभियानाच्या माध्यमातून कमी वेळेत आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ मिळत आहेत. आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच आवास योजनेचा निधी वाढवून देण्यासाठी देखील केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. घरकुल योजना 100 टक्के राबविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कातकरी बांधवांचे स्थलांतर थांबवीत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा.विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. झिरवाळ म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकूल योजनेचे उद्दिष्ट वाढवून मिळावे. प्रत्येक गरजूला घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. गावितांसह मान्यवरांच्या हस्ते मोबाईल युनिट व्हॅनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तसेच मान्यवरांनी कपिलधारा मंदिर परिसराची स्वच्छता ही केली.

या लाभार्थ्यांना केले योजनांचे लाभ वाटप…..
MSEB नवीन विज कनेक्शन
भाऊसाहेब पांडुरंग रन, कल्पना आनंदा वाघ, नामदेव लक्ष्मण गावित, सुरेश खंडू वाघ, सखाराम देवराम मुकणे, पीएम किसान क्रेडिट कार्ड, ज्ञानेश्वर नामदेव वाघ, मंदाबाई बुधा हिलम, नारायण सोमा वाघ, अलका गंगाराम वाघ, एकनाथ पालू मुकणे
रेशनकार्ड वाटप
विठ्ठल देवराम हिलम, संतोष पांडुरंग रन, विलास नारयण रन, पिंटु पंढरी हिलीम, नारायण दामू रन, द्रौपदा भाऊ कवर, अंकुश किसन रन, प्रकाश पांडुरंग रन
जात प्रमाणपत्र वाटप
देवराम एकनाथ चौरे, रोहिदास भगवंत हिलम, दत्तु पांडु वाघ, विठ्ठल नामदेव हिलम, पद्मा शांताराम हिलम, बाळु भिवा हिलम, मंदाबाई बुधा हिलम, राजाराम बाळु वाघ, अलका शंकर दिवे, वसुंधरा पिंटु मुकणे
आयुष्यमान कार्ड वाटप
मनोहर आनंदा वाघ, सोनाली अंकुश रन, कमल पांडुरंग हिलम, फुलाबाई एकनाथ मुकणे, किसन सोमनाथ, दिवे, सविता विठ्ठल वाघ
पी. एम. सन्मान निधी योजना लाभ
पप्पु नाना पवार, सान्याबाई लक्ष्मण वाघ, किसन सोमा हिलम, हरी सिताराम वाघ, वामन झिपा मुकणे

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकला यवतमाळच्या शाळेच्या सहलीसाठी आलेल्या शिक्षक, विदयार्थी यांचे १८ मोबाईल चोरणारा चोर गजाआड….

Next Post

दावोसच्या परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री या तारखेला शिष्टमंडळासमवेत उपस्थित राहणार…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
CM Eknath Shinde 01

दावोसच्या परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री या तारखेला शिष्टमंडळासमवेत उपस्थित राहणार...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011