नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गणेशवाडी भागात राहत्या घरात तोल जावून पडल्याने ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेत सदर व्यक्तीस गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रमोद सुंदरलाल करंजकर (रा.हरिकृष्ण पार्क,अमरधामजवळ,गणेशवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. करंजकर शुक्रवारी (दि.१२) रात्री आपल्या घरात असतांना अचानक भोवळ येवून जमिनीवर कोसळले होेते. या घटनेत त्यांच्या डोक्यास व छातीस दुखापत झाली होती.
त्यामुळे कुटूंबियांनी त्यांना सुयश हॉस्पिटल येथे दाखल केले असता रविवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत डॉ.दिशा राऊत यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वाघमारे करीत आहेत.